गणेशोत्सव म्हणजे ….
गणेशोत्सव म्हणजे
घराची आवराआवर
डगमगलेल्या आयुष्याची
थोडीशी सावरासावर
गणेशोत्सव म्हणजे
पहिल्या दिवशी उडालेली धांडळ
पाहुण्यांचा पाहुणचार करता करता
झालेला थोडासा गोंधळ
गणेशोत्सव म्हणजे
लज्जतदार फराळाची मेजवानी
आणि लाऊडस्पीकर वर मोठ्यामोठ्याने
लावलेली ती गाणी
गणेशोत्सव म्हणजे
कानात घुमणारा टाळांचा निनाद
आणि गप्पागोष्टीतून झालेला
थोडासा वादविवाद
गणेशोत्सव म्हणजे
रात्रभर केलेला जागरण
प्रत्येक गृहिणीस एक संधी
होण्यास सुगरण
गणेशोत्सव म्हणजे
शेवटच्या दिवशी येणारे विसर्जन
कोणाची मोठी गाडी
कोणाचा मोठा आवाज
याचे प्रदर्शन
गणेशोत्सव म्हणजे
माणसाने माणसाशी
जोडलेले गोड बंधन
पण तरी कसे विसरता येईल
भावाने भावाशी
मित्राने मित्राशी
दारू पिऊन केलेले भांडण
- कौस्तुभ पाटील
१३/९/२०१३
गणेशोत्सव म्हणजे
घराची आवराआवर
डगमगलेल्या आयुष्याची
थोडीशी सावरासावर
गणेशोत्सव म्हणजे
पहिल्या दिवशी उडालेली धांडळ
पाहुण्यांचा पाहुणचार करता करता
झालेला थोडासा गोंधळ
गणेशोत्सव म्हणजे
लज्जतदार फराळाची मेजवानी
आणि लाऊडस्पीकर वर मोठ्यामोठ्याने
लावलेली ती गाणी
गणेशोत्सव म्हणजे
कानात घुमणारा टाळांचा निनाद
आणि गप्पागोष्टीतून झालेला
थोडासा वादविवाद
गणेशोत्सव म्हणजे
रात्रभर केलेला जागरण
प्रत्येक गृहिणीस एक संधी
होण्यास सुगरण
गणेशोत्सव म्हणजे
शेवटच्या दिवशी येणारे विसर्जन
कोणाची मोठी गाडी
कोणाचा मोठा आवाज
याचे प्रदर्शन
गणेशोत्सव म्हणजे
माणसाने माणसाशी
जोडलेले गोड बंधन
पण तरी कसे विसरता येईल
भावाने भावाशी
मित्राने मित्राशी
दारू पिऊन केलेले भांडण
- कौस्तुभ पाटील
१३/९/२०१३
No comments:
Post a Comment